#ThisIsTata : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:11 PM2021-04-21T12:11:34+5:302021-04-21T12:12:23+5:30

Twitter Trending Topic: सोशल मीडिया युजर्संनी #ThisIsTata हा हॅशटॅगचा वापर उद्योगपती रतन टाटा यांचे आभार मानण्यासाठी तयार केला आहे.

thanks to ratan tata through thisistata know what is going on | #ThisIsTata : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव!

#ThisIsTata : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव!

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्ही आज सकाळपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरत असाल तर तुम्हाला #ThisIsTata हा हॅशटॅग मिळालाच पाहिजे. सकाळपासूनच ट्विटरवर हा ट्रेंड सुरू आहे. दरम्यान, या हॅशटॅगचा अर्थ थेट उद्योगपती रतन टाटा आहे. सोशल मीडिया युजर्संनी या हॅशटॅगचा वापर उद्योगपती रतन टाटा यांचे आभार मानण्यासाठी तयार केला आहे.

कोरोना संकट काळात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाने पुढाकार घेत भारतीयांची समस्या काही प्रमाणात कमी केली. टाटा समूहाने लिक्विड ऑक्सिजनच्या हालचालीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यात मदत होईल, असे म्हटले जात आहे.

टाटा समूहाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लिहिले की, 'भारतातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  केलेले आवाहन कौतुकास्पद आहे आणि आम्ही टाटा समूहामध्ये कोविड -१९च्या विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी हा प्रयत्न आहे.' आणखी दुसर्‍या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले आहे की, टाटा ग्रुप लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्सची आयात करीत आहे.

मंगळवारी टाटा समूहाने म्हटले होते की, ऑक्सिजनच्या संकटाचा विचार करता ते भारताची आरोग्य रचना मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यापूर्वी एक दिवस आधी टाटा स्टीलने जाहीर केले होते की, दररोज 200-300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्य सरकार आणि रुग्णालयांमध्ये पाठवत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी टाटा समूहाने कोरोना रिलीफ फंडासाठी 1500 कोटींचे योगदान दिले होते. त्याशिवाय मुंबई आणि इतर शहरांमध्ये टाटा समूहाने पंचतारांकित हॉटेल्स करोना योद्धे आणि करोनाबाधितांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून उपलब्ध करून दिली होती.

Read in English

Web Title: thanks to ratan tata through thisistata know what is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.