ट्विटसाठी 'त्या' पोलिसाने मानले शोभा डेंचे आभार
By admin | Published: March 7, 2017 11:23 AM2017-03-07T11:23:46+5:302017-03-07T11:29:30+5:30
मध्यप्रदेश पोलिस सेवेतील दौलतराम जोगावतने त्याचा फोटो टि्वट केल्याबद्दल लेखिका शोभा डे यांचे आभार मानले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मध्यप्रदेश पोलिस सेवेतील दौलतराम जोगावतने त्याचा फोटो ट्विट केल्याबद्दल लेखिका शोभा डे यांचे आभार मानले आहेत. शोभा डे यांनी पोलिसांची खिल्ली उडवण्याच्या इराद्याने दौलतरामचा फोटो ट्विट केला होता. पण त्या फोटोमुळे दौलतराम चर्चेत आला आणि मुंबईतील सैफी रुग्णालयाचे त्याच्याकडे लक्ष गेले.
सैफी रुग्णालयाने दौलतरामची विनामुल्य वजन कमी करणारी जीबीपी शस्त्रक्रिया केली. दौलतरामचे वजन 180 किलो होते. पण दीडवर्षात त्याचे वजन 100 किलोने कमी होईल असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या देखरेखील दौलतरामवर शस्त्रक्रिया आणि उपचार झाले.
दौलतरामने नेमून दिलेला आहार घेतल्यानंतर पुढच्या दीडवर्षात त्याचे वजन 100 किलोने कमी होईल. त्या आहारामुळे रक्तदाब आणि डाबिटीसही नियंत्रणात येईल. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर दौलतरामला पुन्हा नोकरीवर रुजू होता येईल. मध्यप्रदेश सरकारची इच्छा असेल तर त्यांनी दौलतरामच्या शस्त्रक्रियेचा खर्च भरावा आम्ही त्याला व्यक्तीगत कुठलाही चार्ज भरायला लावणार नाही असे सैफी रुग्णालयाने सांगितले.