‘त्या’ नागरिकाची भारतात आश्रयाची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:32 AM2024-06-11T06:32:53+5:302024-06-11T06:33:23+5:30
Court News: सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकी नागरिक क्लॉड डेव्हिड कॉन्व्हिस यांची भारतात आश्रय देण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यांनी आपल्या देशात परत गेल्यास छळ होण्याची भीती असल्याच्या कारणावरून भारतात आश्रय मागितला होता.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकी नागरिक क्लॉड डेव्हिड कॉन्व्हिस यांची भारतात आश्रय देण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यांनी आपल्या देशात परत गेल्यास छळ होण्याची भीती असल्याच्या कारणावरून भारतात आश्रय मागितला होता.अमेरिकेत न्यायालये आहेत आणि तेथील सरकार आपल्या चिंतेकडे लक्ष देईल, असे सांगत न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कॉन्व्हिस यांची याचिका फेटाळून लावली.
काॅन्व्हिस यांनी पेट्रोलला पर्याय शोधल्याचा दावा केला आहे. अमेरिकी नागरिकाने कोर्टात याचिका दाखल करून त्यांना भारतात आश्रय देण्याच्या सूचना केंद्र सरकारला द्याव्यात, अशी विनंती केली होती.