IPL 2023: ९० मिनिटांत टाकावी लागतील २० षटके, अन्यथा...; यंदाच्या आयपीएलमध्ये ५ नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:23 AM2023-04-01T10:23:05+5:302023-04-01T10:23:30+5:30
सामन्यांत गोलंदाजी करणाऱ्या संघाला ९० मिनिटांत सर्व २० षटके संपवावी लागतील.
नवी दिल्ली : आयपीएलचे १६ वे सत्र विशेष आहे. लीगला अधिक रोमांचक बनवण्यासाठी त्यात पाच नवीन नियमांचा समावेश करण्यात आला. नव्या नियमांमध्ये स्लो ओव्हर रेटचा नियमही लागू आहे. संघ निर्धारित वेळेत २० षटके टाकू शकला नाही तर त्याला शिक्षा होणार आहे.
सामन्यांत गोलंदाजी करणाऱ्या संघाला ९० मिनिटांत सर्व २० षटके संपवावी लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला तसे करता आले नाही, तर शिक्षा भोगावी लागेल. टी-२० - आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे कट वेळेनंतर सर्व षटके टाकली जातील, मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे केवळ चार खेळाडू सीमारेषेवर राहतील.
पाच नवे नियम...
इम्पॅक्ट खेळाडूचा नियम, नाणेफेकीनंतर अंतिम ११ जणांना खेळण्याची घोषणा, वाईड आणि नो-बॉलसाठी डीआरएस, चुकीच्या हालचालीवर डेड बॉल आणि स्लो रेटचा नियम यांचा समावेश आहे. इम्पॅक्ट प्लेअरमुळे ११ ऐवजी १२ खेळाडू सामन्यात खेळताना दिसतील. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही संघांकडून केला जाईल.