अमेरिकेतील मॉडेलने वाराणसी शहराला 'भयावह' म्हटलं, नेटीझन्स भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:33 PM2022-11-30T14:33:34+5:302022-11-30T14:34:35+5:30

अपर्णा या वाराणसीत ज्लेलरी ब्रँड इंडियन गॉडेस बुटीकच्या उत्पादकशांची भेट घ्यायला आली होती

The American model called the city of Varanasi scary, netizens were outraged | अमेरिकेतील मॉडेलने वाराणसी शहराला 'भयावह' म्हटलं, नेटीझन्स भडकले

अमेरिकेतील मॉडेलने वाराणसी शहराला 'भयावह' म्हटलं, नेटीझन्स भडकले

Next

वाराणसी म्हणजे भारतीयाचं पवित्र तिर्थस्थान मानलं जातं. साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणूनही वाराणसी जगप्रसिद्ध आहे. काशी, रामेश्वरला जाऊन गंगास्नान केल्यानंतर आुयष्याचं सार्थक होतं, अशी हिंदु धर्मीयांची धारणाही आहे. आता, अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या मॉडेलने वाराणसीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मॉडेल अपर्णा सिंह हिने नुकताच एका बिझनेस टूरच्या अनुषंगाने वाराणसीचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी वाराणसी शहर हे अतिशय भयावह असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या विधानाने लोकांनी तिच्याविरुद्ध राग व्यक्त केला. 

अपर्णा या वाराणसीत ज्लेलरी ब्रँड इंडियन गॉडेस बुटीकच्या उत्पादकशांची भेट घ्यायला आली होती. याचवेळी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तो व्हिडिओ तिने टिकटॉकवर शेअर केला असून त्यातच हे वादग्रस्त विधान केलं आहे. आजपर्यंत मी जिथेही गेले, मला सर्वात भयावह शहर वाटलं ते वाराणसी, असं तिने म्हटलं. अपर्णाच्या या व्हिडिओला टिकटॉक युजर्संने अवमानजनक असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच अपर्णाने माफी मागितली असून माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, असेही स्पष्ट केले. 

दरम्यान, या व्हिडिओच्या सुरुवातीला गंगा नदीचे फुटेज दाखवले असून वास्तविक गंगा नदी प्रदूषित असल्याचं म्हटलं. येथेच लोकं स्नान करत आहेत, जवळीलच रस्त्यावर डेड बॉडीज जळताना दिसत आहेत. हे सर्व किती खराब आहे, असेही तिने म्हटलं होतं. अपर्णाच्या या पोस्टवर हजारो भारतीयांना कमेंट करुन तिला आमच्या पवित्र शहराला बदनाम करण्याबद्दलचा जाब विचारला होता. त्यानंतर, अपर्णाने माफी मागितली आहे.

Web Title: The American model called the city of Varanasi scary, netizens were outraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.