सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 08:00 AM2022-06-03T08:00:39+5:302022-06-03T08:00:45+5:30

गँगस्टर लॉरेन्सच्या भाच्याने केला गोळीबाराचा दावा

The assailants opened fire on Sidhu Moosewala car. Moosewala then pulled out a pistol and fired two rounds. | सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला!

सिद्धू मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या; मात्र त्यानंतर तिनेच दगा दिला!

Next

चंडीगड : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा अद्याप छडा लागलेला नाही. तथापि, मारेकरी तीन दिवसांपासून कारमधून  त्याच्या पाळतीवर होते. याप्रकरणी पोलिसांनी गँगस्टर संपत नेहराची चौकशी केली असून,  तो गॅँगस्टर लॉरेन्सच्या जवळचा आहे. दरम्यान, गँगस्टर लॉरेन्सचा भाचा सचिन बिष्णोई याने दावा केला की,  मुसावालाची हत्या करून विक्की मिड्डूखेडा याच्या हत्येचा सूड घेतला.  गँगस्टर नेहराच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेेदोरे हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले

पिस्तूलने दिला दगा

मुसेवाला यांच्यासोबत कारमध्ये असलेले गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की,  मारेकरी सिद्धू मुसेवालाच्या पाळतीवर होते. पाठलाग करणारे चाहते असावेत, असे मुसेवाला यांना वाटले. मारेकऱ्यांनी मुसेवालांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या. मात्र, त्यांच्या पिस्तुलीत दोनच काडतुसे  होती. गोळीबार थांबल्याने मारेकरी थांबले़  तोपर्यंत बोलेरोमधून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी मुसेवाला यांच्यावर हल्ला केला़.

बिष्णोईची याचिका फेटाळली

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने तुरुंगवास भोगणारा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची याचिका गुरुवारी फेटाळून लावली. मुसेवाला हत्या प्रकरणात मला पंजाब पोलिसांच्या ताब्यात न जाण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. त्याचा हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय आहे.

सचिन बिष्णोईचा दावा

गँगस्टर लॉरेन्सचा भाचा सचिन बिष्णोई याने दावा केला केला की, मीच मुसेवालाची हत्या केली. मी स्वत: गोळ्या झाडल्या. तर आता कुख्यात गुंड भुप्पी राणा याने मुसेवाला यांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचे सांगितले. 

Web Title: The assailants opened fire on Sidhu Moosewala car. Moosewala then pulled out a pistol and fired two rounds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.