"हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू"! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 04:38 PM2023-12-26T16:38:51+5:302023-12-26T16:39:48+5:30
'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे.
'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. भारताची वाढती आर्थिक शक्ती काही लोकांना खटकू लागली आहे. केम प्लुटो आणि साई बाबा या दोन भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. पण आम्ही सांगत आहोत की, ज्याने कुणी हे कृत्य केले असेल त्याला समुद्राच्या तळापासूनही बाहेर काढू आणि धडा शिकवू. त्याला उत्तर देऊ.
'आयएनएस इम्फाळ' कमिशनिंग प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते राजनाथ सिंह -
मुंबईमध्ये मंगलवारी झालेल्या 'आयएनएस इम्फाळ'च्या कमिशनिंग समारंभात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, नौदलाच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, भारताने समुद्रातील गस्त वाढवली आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) सागरी व्यापार नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत प्रयत्न करेल.
तसेच, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले, कमर्शिअल शिप्सवर समुद्री दरोडे आणि ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी चार विध्वंसक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. यावर पी-8आय विमान, डोर्नियर्स, सी गार्डियन, हेलीकॉप्टर आणि तटरक्षक दलाच्या जहाजांचा समावेश आहे.