आजोबांचा भलताच हट्ट...! 11 दिवसांनी कबरीतून पुन्हा बाहेर काढला नातीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:13 PM2022-11-07T20:13:34+5:302022-11-07T20:19:53+5:30

उत्तर प्रदेशातील संभल येथे 11 दिवसांपूर्वी झालेल्या नवजात मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

The body of a newborn girl death 11 days ago has been exhumed from Sambhal in Uttar Pradesh  | आजोबांचा भलताच हट्ट...! 11 दिवसांनी कबरीतून पुन्हा बाहेर काढला नातीचा मृतदेह

आजोबांचा भलताच हट्ट...! 11 दिवसांनी कबरीतून पुन्हा बाहेर काढला नातीचा मृतदेह

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे 11 दिवसांपूर्वी झालेल्या नवजात मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे. खरं तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (DM) आदेशानुसार नवजात मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पैसे न दिल्याने सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन न दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या परिजनांनी आयजीआरएस पोर्टल आणि कोर्टात तक्रार केली होती.

दरम्यान, चंदौसी परिसरात राहणाऱ्या गायत्री या महिलेला 11 दिवसांपूर्वी प्रसूती वेदना होत असल्याने चंदौसी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. इथे महिलेने रुग्णालयात नवजात बाळाला जन्म दिला, मात्र काही तासांतच या नवजात मुलीचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील महिला डॉक्टर सारिका अग्रवाल आणि स्टाफ नर्स यांच्यावर लाचेची रक्कम न दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मोठा गदारोळ घातला. 

11 दिवसांनंतर मृतदेह काढला बाहेर 
मात्र काही वेळानंतर नातेवाईकांनी नवजात मुलीला तलावाच्या काठावर पुरून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. नवजात मुलीच्या मृत्यूनंतर तिचे आजोबा गोकिल सिंग यांनी रूग्णालय प्रशासनाविरूद्ध कारवाईची मागणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल IGRS पोर्टलवर तक्रार केली आणि न्यायालयात 156 (3) चा खटला देखील दाखल केला. यानंतर संभल जिल्ह्याचे डीएम मनीष बन्सल यांच्या आदेशानुसार आयजीआरएस आणि कोर्टामार्फत केलेल्या तक्रारीची दखल घेत नवजात मुलीचा मृतदेह पोलिसांच्या मदतीने 11 दिवसांनंतर कबरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नवजात मुलीचा मृतदेह सील करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याची कारवाई सुरू केली.  

मृत मुलीचे आजोबा गोकुल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चांदौसी सीएससीमध्ये दाखल केले होते, त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर सारिका आणि स्टाफ नर्स रुची यांनी 5 हजार रूपयांची मागणी केली होती आणि त्यांना पैसे देऊनही मुलीला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे मुलगी जिवंत असल्याचे सांगून तिला आमच्याकडे स्वाधीन केल्याचा आरोपही मुलीच्या आजोबांनी केला आहे. 

रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली धमकी 
मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांविरूद्ध आवाज उठवला असता त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खटल्यात अडकवण्याची धमकी दिली. गोकुल सिंग म्हणाले की, "न्यायाच्या मागणीबाबत मी डीजीपी, आयुक्त आणि आयजीआरएस पोर्टलवर तक्रार केली होती. त्या दिवशी मुलीच्या मृत्यूनंतर मी माझ्या सुनेवर प्रथम उपचार केले होते, कारण तिचा मृत्यू झाला असता तर तिच्या माहेरच्या लोकांनी आमच्यावर कारवाई केली असती, आज मुलीचा मृतदेह उचलला जात आहे. बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येत आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The body of a newborn girl death 11 days ago has been exhumed from Sambhal in Uttar Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.