दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली; भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:14 IST2023-11-02T09:13:35+5:302023-11-02T09:14:13+5:30
या अपघातात एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजता हा अपघात झाला.

दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली; भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
पंजाबच्या मलेरकोटलामध्ये रात्री भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनरांच्यामध्ये एका कार सापडल्याने कारमधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हे सर्वजण एकाच गावातील असल्याचे सांगितले जात आहे. मलेरकोटला येथूवन बाबा हदर शेख दर्ग्य़ाहून ते घरी परतत होते. संगरुरपासून १५ किमी अंतरावरील मेहला चौक भागात हा अपघात झाला. दोन मोठे कंटेनर वाहतूक करणारे ट्रक एकमेकांवर आदळले. यामध्ये ही कार सापडली.
या अपघातात एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजता हा अपघात झाला. हे सर्व सुनामला जात होते. कारचा चेंदामेंदा झाल्याने पोलिसांनी वेल्डिंग करण्याच्या मशीनने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. यानंतर हे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.
मृतांमध्ये दीपक जिंदल, नीरज सिंगला आणि त्यांचा मुलगा, लक्की कुमार, विजय कुमार व दवेश जिंदल यांचा समावेश आहे.