यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:23 PM2024-10-22T17:23:20+5:302024-10-22T17:50:53+5:30
Gold Treasure Found In Car: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे काल रात्री पोलिसांना सोन्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात यश मिळालं. यमुना एक्स्प्रेसवेवर तपासणी सुरू असताना पोलिसांना एका आलिशान कारला थांबवले आणि झडती घेतली. तेव्हा या कारमधून १२ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने सापडले.
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे काल रात्री पोलिसांना सोन्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात यश मिळालं. यमुना एक्स्प्रेसवेवर तपासणी सुरू असताना पोलिसांना एका आलिशान कारला थांबवले आणि झडती घेतली. तेव्हा या कारमधून १२ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची बाजारामधील किंमत जवळपास ८ कोटी रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी पोलिसांनी या कारमधून जात असलेल्या दोन लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मथुरा येथील थाना मांट परिसरात घडली. येथे यमुना एक्सप्रेसवेवर असलेल्या टोल नाक्याजवळ तपासणीदरम्यान, पोलिसांनी एक कार थांबवली. तसेच या आलिशान कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये १२.५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत सुमारे ८ कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधून प्रवास करत असलेल्या व्यक्तींकडे या दागिन्यांबाबत विचारणा केली. मात्र त्यांना काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी याची माहिती जीएसटी विभागाला दिली आहे. तसेच अधिक तपास केला जात आहे.