माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

By योगेश पांडे | Published: May 20, 2024 02:04 PM2024-05-20T14:04:32+5:302024-05-20T14:04:56+5:30

२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. 

The challenge of 'Khela Hobe' before the former judge | माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

माजी न्यायाधीशांसमोर ‘खेला होबे’कारचे आव्हान

योगेश पांडे -

काेलकाता : पश्चिम बंगाल लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात तमलुक मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या जागेवर कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांना तिकीट दिले आहे, तर तृणमूलकडून २०२१ मध्ये ऐतिहासिक ‘खेला होबे’ या प्रचारगीतामागील डोके असलेल्या पक्षाच्या सोशल मीडिया सेलप्रमुख देग्बांशु भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी जज विरुद्ध तरुणतुर्क टेक्नोसॅव्ही उमेदवार असा सामना रंगला आहे.

२००९ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, २००९ व २०१४ साली येथून जिंकून येणारे सुवेंदू अधिकारी व २०१९ मधील विजयी उमेदवार दिब्येंदू अधिकारी आता भाजपच्या गोटात आहेत. यंदा भाजपकडून येथे पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- तमलुकमध्ये भूमिपुत्रांसाठी रोजगाराचा अभाव असल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर
- मतदारसंघातील सातपैकी तीन जागांवर भाजपचे आमदार असल्याने तृणमूलसमोर मोठे आव्हान
- गंगोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून तृणमूलचे पदाधिकारी आणखी संतापले आहेत. यावरून तृणमूलने त्यांच्यावर टीकास्त्रदेखील सोडले होते.

२०१९ मध्ये काय घडले?
दिब्येंदु अधिकारी, टीएमसी (विजयी) - ७,२४,४३३ 
सिद्धार्थशंकर नस्कर, भाजप - ५,३४,२६८
 

Web Title: The challenge of 'Khela Hobe' before the former judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.