'...म्हणून आमची भारतासोबत चकमक झाली'; २२ तास उलटल्यानंतर चीनचा वेगळाच कांगावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:28 PM2022-12-13T19:28:49+5:302022-12-13T19:30:02+5:30

Indian-Chinese troops clash: तवांग सेक्टरमध्ये जवळपास ३०० ते ४०० चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला.

The Chinese Army has accused Indian Army soldiers of attempting to illegally cross the disputed border. | '...म्हणून आमची भारतासोबत चकमक झाली'; २२ तास उलटल्यानंतर चीनचा वेगळाच कांगावा!

'...म्हणून आमची भारतासोबत चकमक झाली'; २२ तास उलटल्यानंतर चीनचा वेगळाच कांगावा!

Next

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेमधील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाल्याची माहिती समोर आली. 

तवांग सेक्टरमध्ये जवळपास ३०० ते ४०० चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. ९ डिसेंबर रोजी ही घटना घडली. तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडण्यासाठी चीनने आधीच पूर्ण तयारी केली होती, अशी माहिती हाती लागली आहे. चिनी सैन्य घुसखोरीसाठी सज्ज होते. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता, असंही सांगण्यात येत आहे.

चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी लष्कर आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीवर चिनी लष्कराकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. या चकमकीबाबत चीनने भारतीय लष्करावर आरोप केले आहेत. भारतीय लष्कराच्या सैनिकांनी बेकायदेशीरपणे वादग्रस्त सीमा ओलांडल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चिनी लष्कराने केला आहे. त्यामुळे ही चकमक झाल्याचं चिनने म्हटलं आहे. 

दरम्यान, चीनने ज्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, तो भाग समुद्रसपाटीपासून १४ ते १७ हजार फूट उंच आहे. चीनकडून याआधीदेखील घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला होता. त्यामुळे चिनी सैन्याने रात्रीची वेळ निवडली. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा मध्यरात्रीचा घुसखोरीचा डाव पुन्हा उधळून लावला. 

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत वाचले निवेदन-

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दुपारी १२ वाजता लोकसभेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ९ डिसेंबरला PLAच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात सीमेवील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले. आपल्या सैनिकांनी धैर्याने PLAला भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करण्यापासून रोखले, असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The Chinese Army has accused Indian Army soldiers of attempting to illegally cross the disputed border.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.