भगवान रामपुत्र लव यांनीच वसवले हाेते 'लाहोर' शहर; उत्खननातील पुराव्याचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:36 AM2023-04-26T06:36:15+5:302023-04-26T06:37:31+5:30

हजारो वर्षे जुने मंदिर आणि शिवालय, उत्खननातूनही माहिती आली समोर

The city of Lahore was built by Lord Ramputra Love; Mention of evidence from excavations | भगवान रामपुत्र लव यांनीच वसवले हाेते 'लाहोर' शहर; उत्खननातील पुराव्याचा उल्लेख

भगवान रामपुत्र लव यांनीच वसवले हाेते 'लाहोर' शहर; उत्खननातील पुराव्याचा उल्लेख

googlenewsNext

नवी दिल्ली : लाहोर या शहराचे संस्थापक दुसरे-तिसरे कोणी नसून भगवान रामाचे पुत्र लव हेच आहेत, अशी कबुली चक्क पाकिस्तानी वृत्तपत्राने दिली आहे. राजकुमार लव यांच्या नावावरून लाहोर हे नाव पडले. तसेच, पाकिस्तानी शहर ‘कसूर’ हे भगवान रामाचे दुसरे पुत्र कुश यांनी वसवल्याचेही म्हटले आहे. ‘द डॉन’ वृत्तपत्रातील  बातमीत उत्खननातील  पुराव्यांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, लाहोरमध्ये अनेक जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू प्राचीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. 

लाहोर किल्ल्यात आहे प्राचीन लव मंदिर
लाहोर किल्ल्यातील लव मंदिर ही लाहोरमधील सर्वांत जुनी इमारत आहे. हे मंदिर किल्ल्याच्या निर्मितीच्या खूप आधीपासून येथे होते. सम्राट अकबराने आजूबाजूला किल्ला बांधला. त्यानंतर हे मंदिरदेखील किल्ल्याचा एक भाग बनले. लाहोर किल्ल्यात मंदिराखाली उत्खनन करण्यात आले; ज्यामध्ये त्याच्या प्राचीन असण्याचे पुरावे मिळाले.

५०० वर्षांपूर्वीची हनुमानाची मूर्ती ऑस्ट्रेलियाकडून परत

साधारण ५०० वर्षांपूर्वीची धातूपासून बनवलेली भगवान हनुमानाची प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलियाने भारताला परत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. चोल काळातील (१४ वे-१५ वे शतक) भगवान हनुमानाची ही धातूची मूर्ती आहे. अरियालूर जिल्ह्यातील पोट्टावेल्ली वेल्लोर येथील श्री वरथराज पेरुमलच्या विष्णू मंदिरातून ही मूर्ती चोरीला गेली होती.

चीनच्या युआन स्वांगनेही केले वर्णन
सातव्या शतकात चिनी प्रवासी युआन स्वांग भारतात आला हाेता. ताे लाहाेरला गेला हाेता. त्यानेही या शहराचे माेठी मंदिरे आणि बगीचांचे शहर, असे वर्णन केले हाेते. वर्ष ९८२ मधील काही दस्तऐवजांमध्ये लाहाेरमधील मंदिरांचा उल्लेख आढळताे. 

Web Title: The city of Lahore was built by Lord Ramputra Love; Mention of evidence from excavations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.