एसीची थंड हवा पृथ्वीला भाजून काढणार! कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनापेक्षाही मोठी हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 08:10 AM2023-05-19T08:10:03+5:302023-05-19T08:13:04+5:30
एअर कंडिशनरमधील सर्वात सामान्य रेफ्रिजरंट्सपैकी एक म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स (एचएफसी). त्यात कार्बन डाय ऑक्साइडपेक्षा १००० पट अधिक तापमानवाढ शक्ती असू शकते.
नवी दिल्ली : सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक उत्पादकतेसाठी एसी चांगले आहेत, परंतु, हवामानासाठी घातक आहेत. स्वस्त एसी युनिट्समध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनापेक्षा अधिक धोकादायक आहे. स्वस्त एसी विकसनशील देशांमध्ये विकले जातात. सिंगापूरमधील जागतिक बँकेचे हवामानतज्ज्ञ आभास झा म्हणतात की, कार्यक्षमता सुधारली नाही तर ते पृथ्वीला भाजून काढतील.
भारतासारख्या देशात वाढत्या तापमानासोबतच रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या आठवड्याच्या अखेरीस उत्तरेकडील मैदानी भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, भारतासह चीन, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स सारख्या देशांमध्ये एअर कंडिशनर्सची मागणी वाढत आहे. एका अंदाजानुसार, दशकाच्या अखेरीस जगात आणखी एक अब्ज एसी असतील. २०४० पूर्वी एअर-कंडिशनर मार्केट जवळजवळ दुप्पट होईल असा अंदाज आहे.
अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की, या वर्षी प्रथमच दरडोई उत्पन्न ९००० डॉलरपेक्षा जास्त असेल. त्यामुळे एसीची खरेदी आणखी वाढू शकते.
फटका कशामुळे?
एअर कंडिशनरमधील सर्वात सामान्य रेफ्रिजरंट्सपैकी एक म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स (एचएफसी). त्यात कार्बन डाय ऑक्साइडपेक्षा १००० पट अधिक तापमानवाढ शक्ती असू शकते.
पुढील ५ वर्षे कडक उन्हाचा तडाखा!
- हवामान बदलाशी झुंजत असलेल्या जगाला संयुक्त राष्ट्रांचा इशारा चिंताजनक आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने हरितगृह वायू आणि एल निनो यांच्या संयोगामुळे पुढील पाच वर्षे (२०२३-२०२७) विक्रमी उष्णतेचा अंदाज वर्तवला.
- २०१५-२०२२ कालावधीतील आठ सर्वांत उष्ण वर्षांची नोंद झाली आहे. यापुढेही तापमानात वाढीची भीती आहे.