पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 06:51 AM2024-10-16T06:51:40+5:302024-10-16T06:52:11+5:30

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही.

The commission rejected the demand to freeze Pipani symbol | पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली

पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली

नवी दिल्ली : पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, ती आयोगाने फेटाळली आहे. 

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटे दिसते. ते मोठे करण्याची पहिली विनंती शरद पवार गटाने आयोगाला केली होती, तसेच तुतारीसारखे दिसणारे दुसरे चिन्ह हटविण्यात यावे, ही दुसरी विनंती केली होती. यावर निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली. तुतारी चिन्ह कसे दिसले पाहिजे याबाबत त्यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी चिन्हाचा आकार दिला. त्यांनी दिलेल्या आकारातील पहिला आकार आम्ही मान्य केला आहे.

कसा बसला फटका?
१. सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणीने ३७ हजार मते घेतली होती. 
२. बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणे थोडक्यात बचावले. 
३. बारामती, शिरुर, अहमदनगर, रावेर, भिवंडी व वर्धा या ६ मतदारसंघामध्ये पिपाणी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर.
 

Web Title: The commission rejected the demand to freeze Pipani symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.