देशावरील कर्ज पोहोचले १५५.६० लाख कोटींवर ! ९ वर्षांत कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:20 AM2023-07-25T05:20:52+5:302023-07-25T05:21:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटींवर पोहोचली आहे.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटींवर पोहोचली आहे.
गेल्या ३१ मार्चपर्यंत देशाच्या नोंदविल्या गेेलेल्या एकूण जीडीपीच्या ५७.१० टक्के इतके या कर्जाचे प्रमाण आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याची रक्कम त्यावेळच्या जीडीपीच्या तुलनेत ५२.२० टक्के इतकी होती.
व्याजच ९.२८ लाख कोटी
२०१८-१९ मध्ये भारत कर्जाच्या व्याजापोटी ५.८३ लाख कोटी रुपये देत होता. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण ९.२८ लाख कोटी झाले.
२०२५-२६ या वर्षापर्यंत जीडीपीच्या तुलनेत वित्तीय तूट ४.५ टक्क्यांपेक्षाही कमी करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने बाळगले आहे.
देशावरील कर्ज (लाख कोटींत)
आर्थिक वर्ष कर्जे
२०१९-२० १०५.२०
२०२०-२१ १२१.०९
२०२१-२२ १५५.६०
९ वर्षांत २.६५ पट विक्रमी वाढ