राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 06:04 AM2024-10-16T06:04:59+5:302024-10-16T06:08:00+5:30

नांदेड लाेकसभेसाठी २० नाेव्हेंबर, वायनाडसाठी १३ ला मतदान

The decision of power in the Maharashtr in a single phase is the election program | राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके

राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके


नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. प्रचाराचे फटाके दिवाळीच्या आधी सुरू होतील आणि दिवाळी संपल्यानंतर अधिक जोमाने वाजतील. दोन टप्प्यांत निवडणुका होतील, असे धुरंधर अंदाज व्यक्त होत होते. मात्र, राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली. १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत झारखंडमध्ये निवडणुका पार पडतील व मतमोजणी २३ नोव्हेंबरलाच होईल. या घोषणेसोबतच दोन्ही राज्यांत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.

५० ठिकाणी पाेटनिवडणुका
यासोबतच विविध राज्यांतील ४८ विधानसभा व लोकसभेच्या दोन जागांसाठी दोन टप्प्यांत पोटनिवडणुका होतील. त्यातील ४७ विधानसभा व एका लोकसभा जागेसाठी (वायनाड) १३ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. एक लोकसभा (नांदेड) व एक विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकांची मतमोजणी देखील २३ नोव्हेंबरलाच होईल. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम -
अधिसूचना -    २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख -    २९ ऑक्टोबर २०२४
अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख -    ४ नोव्हेंबर २०२४
प्रचार ताेफा थंडावणार -    १८ नोव्हेंबर २०२४
एक्झिट पाेल -    २० नोव्हेंबर २०२४

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेश केले दोन शेर...
१. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांबाबत - जम्हूरियत के जश्न में आपकी शिरकत, दुनिया देखेगी नापाक इरादों के शिकस्त की कहानी
२. ईव्हीएमबद्दल असलेल्या तक्रारींविषयी - 
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत... पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या मागणीसंदर्भात राजीवकुमार म्हणाले की, पोलीस महासंचालकांची निवड यूपीएससी करते. प्रकाश सिंग खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. त्या अधीन राहून निर्णय घेऊ.

सर्व प्रमुख नेत्यांची अस्मिता पणाला
सध्याचे संख्याबळ असे... - एकूण जागा -२८८
भाजप -    १०३
शिंदेसेना -    ३९
अजित पवार गट - ३९
काँग्रेस -    ३७
उद्धवसेना -    १५
शरद पवार गट     - १२
बविआ -    ३
समाजवादी पार्टी -    २
एमआयएम -    २
प्रहार जनशक्ती -    १
मनसे -    १
स्वाभिमानी पक्ष     -    १
शेकाप -        १
रासप -    १
माकप -    १
क्रांशेपा -    १
जनसुराज्य शक्ती -    १
अपक्ष -    १३
रिक्त     १४
(अजित पवार गटातून बाहेर पडलेले बबन शिंदे सध्या कोणत्याही पक्षात नाहीत.)

झारखंडमध्ये दाेन टप्पे -
टप्पा १ - नाेव्हेंबर - १३
टप्पा २ - नाेव्हेंबर - २०
निकाल - नाेव्हेंबर - २३
जिल्हे - २४ I जागा - ८१ I मतदार - २.६ कोटी
सत्तारूढ महागठबंधन
झारखंड मुक्ती मोर्चा     २७
काँग्रेस     १८
राजद     १
माकप     १

एनडीए 
भाजप     २४
आजसू     ३
अजित पवार गट     १
अपक्ष, अन्य     ६

असा आहे निवडणूक कार्यक्रम
                     पहिला टप्पा    दुसरा टप्पा
अधिसूचना         १८ ऑक्टोबर     २२ ऑक्टोबर 
अर्जाची अंतिम तारीख    २५ ऑक्टोबर     २९ ऑक्टोबर 
परत घेण्याची अंतिम तारीख  ३० ऑक्टोबर     १ नोव्हेंबर 
प्रचार ताेफा थंडावणार       ११ नोव्हेंबर     १८ नोव्हेंबर
एक्झिट पाेल               २० नोव्हेंबर 

१.८५ कोटी २० ते २९ वयोगटातील मतदार 
६,३६,२७८ दिव्यांग मतदार
२०,९३,००० - १८ ते १९ वयोगटातील नवमतदार 
१२,४३,१९२ - ८५ वर्षांवरील मतदार 

कर्तव्य बजावण्यास सज्ज व्हा...
मतदारांची संख्या (कोटी)
        २०१९    २०२४  
पुरुष        ४.६९    ४.९७     
महिला    ४.२८        ४.६६ 
तृतीयपंथी    २,६३७*    ६,०३१* 
                *हजार

२०१९ - ८,९८,३८,२६७
२०२४ - राज्यात ६६ लाखांनी वाढले मतदार

Web Title: The decision of power in the Maharashtr in a single phase is the election program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.