अंजलीला सोडून का पळाली, त्या रात्री नेमकं काय झालं?; मैत्रिणीने पोलिसांसमोर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:25 PM2023-01-03T16:25:19+5:302023-01-03T16:26:45+5:30

सदर घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी पीडित तरुणी अंजली सिंह हिची मैत्रिणीचा जबाब नोंदवला आहे.

The Delhi Police has recorded the statement of the friend of the victim, Anjali Singh, regarding the said incident. | अंजलीला सोडून का पळाली, त्या रात्री नेमकं काय झालं?; मैत्रिणीने पोलिसांसमोर केला खुलासा

अंजलीला सोडून का पळाली, त्या रात्री नेमकं काय झालं?; मैत्रिणीने पोलिसांसमोर केला खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील सुलतानपुरीमधील कंझावाला भागात घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. ज्यांनी या भयावह घटनेचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत त्यांचा थरकाप उडाला आहे. आरोपी पीडित तरुणीला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले. त्यामुळे या दुर्घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. 

सदर घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी पीडित तरुणी अंजली सिंह हिची मैत्रिणीचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मैत्रिण तपासात सहकार्य करत आहे. त्या रात्री घडलेला प्रकारही तिने पोलिसांना सांगितला. अंजलीच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानूसार, एका हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. अपघातापूर्वी त्यांनी तिथे काही मित्रांसोबत बर्थ डे पार्टीदेखील केली. 

हॉटेलमधून निघाल्यानंतर जेव्हा कारची त्यांच्या स्कूटीला धडक बसली तेव्हा अंजली कारच्या समोर पडली आणि तिच्या अंगावरुन कार गेली. या घटनेमुळे ती घाबरली. त्यामुळे तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. मात्र अपघातात कार चालकाची चूक असल्याचे अंजलीच्या मैत्रिणीने सांगितले.

आरोपींनी आपण दारूच्या नशेत असल्याचे पोलीस चौकशीत सांगितले होते. अपघातानंतर मुलीचा पाय त्यांच्या गाडीत अडकला, त्यांनाही कळले नाही. मात्र जेव्हा कळले, तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. अशा स्थितीत त्यांनी भीतीने मृतदेह रस्त्यावर टाकून पळ काढला. दिल्ली पोलिसांनी कारमधील पाच जणांविरुद्ध आयपीसी कलम 304 आणि 120B (गुन्हेगारी कट) लागू केले आहे. पाचही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमधून तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचं समोर आले आहे. त्याशिवाय तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर कोणत्याही जखमा मिळालेल्या नाहीत. पण हा रिपोर्ट अद्याप पोलिसांपर्यंत पोहचलेला नाही. अद्याप एफएसएल (FSL)रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. 

दरम्यान, संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या भयावह घटनेमधील जे पाच आरोपी आहेत. त्या आरोपींपैकी एकजण भाजपाच नेता आहे. त्याचं नाव मनोज मित्तल असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील सुलतानपुरी भागात त्याचं रेशनचं दुकान आहे. तसेच त्या परिसरात त्याचे पोस्टर्सही लावलेले दिसून येतात. ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा मनोज मित्तल हा कारमध्ये उपस्थित होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये सदर तरुणी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे. तर कारचालक तिला फरफटत नेत यूटर्न घेताना दिसत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The Delhi Police has recorded the statement of the friend of the victim, Anjali Singh, regarding the said incident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.