मोदी सरकारचा विकास ‘ट्रेड मिलवर’ धावल्यासारखा; काँग्रेस नेते  पी. चिदम्बरम यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:08 PM2022-02-09T13:08:44+5:302022-02-09T13:08:44+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला मंगळवारी राज्यसभेत सुरुवात झाली. या चर्चेत भाग घेत असताना केंद्र सरकारने  केलेले विकासाचे दावे फोल असल्याचे सांगून चिदम्बरम म्हणाले, देशातील ६० लाख लघु व मध्यम उद्योग बंद झाले आहेत.

The development of Modi government is like running on a 'trade mill' says Congress leader P. Chidambaram | मोदी सरकारचा विकास ‘ट्रेड मिलवर’ धावल्यासारखा; काँग्रेस नेते  पी. चिदम्बरम यांचा टोला

मोदी सरकारचा विकास ‘ट्रेड मिलवर’ धावल्यासारखा; काँग्रेस नेते  पी. चिदम्बरम यांचा टोला

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे होत असलेला विकास ट्रेड मिल मशीनवर धावल्यासारख्या आहे. दम तर लागतो; परंतु पुढे काही जात नाही, एकाच जागेवर राहतो, अशा मार्मिक शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्ला चढविला.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला मंगळवारी राज्यसभेत सुरुवात झाली. या चर्चेत भाग घेत असताना केंद्र सरकारने  केलेले विकासाचे दावे फोल असल्याचे सांगून चिदम्बरम म्हणाले, देशातील ६० लाख लघु व मध्यम उद्योग बंद झाले आहेत. देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात घट झाली आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत तळाला गेला आहे. बेरोजगारीचा दर वाढला आहे. संपत्ती काही लोकांच्या घरातच जात आहे तर मग विकास कुणाचा होत आहे.
 

Web Title: The development of Modi government is like running on a 'trade mill' says Congress leader P. Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.