नव्या संसद भवनाचे दार २८ मे रोजी उघडणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:29 AM2023-05-19T11:29:55+5:302023-05-19T11:30:56+5:30
नव्या संसद भवनाची उभारणी केंद्र सरकारने करावी असा ठराव लोकसभा, राज्यसभेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी संमत केला होता.
नवी दिल्ली : संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी उद्घाटन करणार आहेत. नव्या संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याची विनंती केली.
नव्या संसद भवनाची उभारणी केंद्र सरकारने करावी असा ठराव लोकसभा, राज्यसभेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी संमत केला होता. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भवनाचा पायाभरणी समारंभ पार पडला होता. या वास्तूचे बांधकाम विक्रमी वेळेत तसेच बांधकामाचा उत्तम दर्जा राखून पूर्ण करण्यात आले आहे. नव्या संसद भवनात कामकाजासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यक सर्व अत्याधुुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लाेकसभेत ८८८ सदस्यांसाठी आसन व्यवस्था -
नवीन संसद भवनातील लोकसभा सभागृहात ८८८ व राज्यसभेत ३८४ सदस्यांसाठी आसन व्यवस्था आहे.
भविष्यातील गोष्टींचा वेध घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे.