लसीचा प्रभाव सहा महिनेच, मग बूस्टर डोससाठी ९ महिन्यांचा कालावधी का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:19 AM2022-01-25T07:19:41+5:302022-01-25T07:20:10+5:30
मग बूस्टर डोससाठी ९ महिन्यांचा कालावधी का?
सध्या देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्धे यांना खबरदारीचा डोस (प्रिकॉशनरी डोस) दिला जात आहे. यालाच बूस्टर डोस असेही संबोधले जाते. आता मुद्दा असा आहे की, लसीचे दोन डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यात नऊ महिन्यांचा कालावधी असावा की नको?
सद्य:स्थिती काय?
nओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्धे
यांना प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरुवात झाली आहे.
nज्यांचे पूर्ण लसीकरण
झाले आहे त्यांनाच हा प्रिकॉशनरी डोस दिला जात आहे.
nलसीचे दोन्ही डोस घेण्यास नऊ महिन्यांचा कालावधी झालेल्यांनाच प्रिकॉशनरी डोस दिला जात आहे.
लसीच्या डोसमध्ये किती अंतर असावे?
nकोरोनाप्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोसचा प्रभाव सहा महिनेच राहतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
nलसीकरण झाल्यानंतर तीन महिन्यांनी ३० टक्के लोकांची कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे अलीकडेच एका संशोधनात स्पष्ट झाले.
nत्यातच दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यात नऊ महिन्यांचे अंतर असावे, या सरकारच्या म्हणण्याला अनेक राज्यांनी विरोध दर्शवला आहे.
nआंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनी दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोस यांच्यातील अंतर सहा महिन्यांचे करावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्राला लिहिले आहे. त्यांच्या
म्हणण्यानुसार कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लसींचा प्रभाव सहा महिन्यांनी ओसरायला लागतो. अशावेळी बूस्टर डोस देणे गरजेचे ठरते.
ब्रिटन : लसीच्या दोन्ही डोसनंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस
अमेरिका : लसीच्या दोन्ही डोसनंतर पाच महिन्यांनी बूस्टर डोस
फ्रान्स : लसीच्या दोन्ही डोसनंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस
nजागतिक अभ्यासानुसार कोणत्याही लसीचा प्रभाव अधिकाधिक सहा महिनेच राहतो.
nराजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक आहे.