मतदार राजाने उडवली त्या आठ खासदारांची रात्रीची झाेप, चार मतदारसंघांत मतदान वाढले, चार ठिकाणी घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:20 AM2023-11-29T09:20:54+5:302023-11-29T09:21:30+5:30
विधानसभा निवडणुकीत ८ खासदार रिंगणात उतरले हाेते. त्यापैकी ४ जणांच्या मतदारसंघात मतदान घटले, तर चाैघांच्या मतदारसंघात वाढले. त्यामुळे हे खासदार बुचकळ्यात पडले आहेत.
जयपूर : विधानसभा निवडणुकीत ८ खासदार रिंगणात उतरले हाेते. त्यापैकी ४ जणांच्या मतदारसंघात मतदान घटले, तर चाैघांच्या मतदारसंघात वाढले. त्यामुळे हे खासदार बुचकळ्यात पडले आहेत. ज्या ठिकाणी मतदान घटले, तेथील खासदारांची चिंता वाढली आहे.
हनुमान बेनीवाल यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान घटले तर, बाबा बालकनाथ यांच्या मतदारसंघात सर्वाधिक वाढले आहे.
- ७ खासदार भाजपचे तर एक खासदार आरएलपीचा आहे. ६ खासदार स्वत:च्याच लाेकसभा क्षेत्रातील मतदारसंघातून लढले.
- २०१९मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्वच विधानसभा मतदारसंघात मतदान वाढले आहे.
- सर्वाधिक वाढ तिजार मतदारसंघात झाली आहे.
- जास्त वाढ सांचाैर, सवाई माधाेपूर व किशनगड येथे झाली आहे.