"...संविधानावर सर्वात मोठा प्रहार"; अभिभाषणादरम्यान काय-काय बोलल्या राष्ट्रपती मुर्मू?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:09 PM2024-06-27T14:09:13+5:302024-06-27T14:10:23+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. त्या पुढे म्हणाल्या, आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध करायला हवा.
इमरजन्सी अर्था आणीबाणी हा भारताच्या संविधानावर सर्वात मोठा प्रहार होता. 1975 मध्ये जेव्हा आणीबाणीची घोषणा करण्यात आली, तेव्हा देशात हाहाकार माजला होता. तेव्हा लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्नही झाले, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. त्या पुढे म्हणाल्या, आपल्या लोकशाहीला हानी पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सर्वांनी निषेध करायला हवा. फुटीरतावादी शक्ती, लोकशाही कमकुवत करण्याचा आणि देशांत तसेच देशाबाहेरूनही समाजात फूट पाडण्याचे कारस्थान आखत आहेत.
अब भारत के उस भूभाग, हमारे जम्मू-कश्मीर में भी संविधान पूरी तरह लागू हो गया है, जहां आर्टिकल 370 की वजह से स्थितियां कुछ और थीं। pic.twitter.com/pyxQXPcx5r
— President of India (@rashtrapatibhvn) June 27, 2024
"तेव्हा संपूर्ण देश अंधरात बुडाला होता" -
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "आणीबाणी हा संविधानावरील हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता. आणीबाणीदरम्यान संपूर्ण देश अंधारात बुडाला होता. मात्र, देश अशा असंवैधानिक शक्तींचा पराभव करण्यात यशस्वी ठरला."
खासदारांनाही दिला सल्ला -
राष्ट्रपती म्हणाल्या, आजचा काळ भारतासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि संविधान हा आपल्यासाठी 'जनचेतने'चा भाग आहे. धोरणांना विरोध करणे आणि संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणे या वेगळ्या गोष्टी आहेत. सर्व सदस्यांसाठी जनतेचे हित सर्वोपरी असायला हवे.
CAA संदर्भात काय म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू? -
#WATCH | President Droupadi Murmu addresses a joint session of both Houses of Parliament, she says "My Government has started giving citizenship to refugees under the CAA law. I wish a better future for the families who have received citizenship under CAA. My Government is… pic.twitter.com/0RpZSA5Vi0
— ANI (@ANI) June 27, 2024