पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:02 PM2023-07-20T15:02:06+5:302023-07-20T15:02:55+5:30

"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे."

The entire country was shaken by the Manipur incident Prime Minister angry SC seeks answer information taken by Amit Shah on manipur video incident | पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

googlenewsNext

मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून फिरवण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घठनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये रस्त्यावरही आंदोलने सुरू झाली आहेत. या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये आक्रमक होण्याच्या तयारीत असतानाच, सरकारही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून उत्तरे मागवले आहे. पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.

यातच, पावसाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ही घटना मनिपूरमध्ये झाली असली तरी, या घटनेमुळेसंपूर्ण देशाचा अपमान झाला आहे. तसेच 140 कोटी लोक या घटनेमुळे लज्जित आहेत. या घटनेत सहभागी असलेले सुटणार नाहीत. त्यांच्यावर संपूर्ण शक्तीनिशी आणि कडक कारवाई करण्यात येईल. महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केले.

..तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ - CJI 
यातच, सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत तीव्र शब्दात भाष्य केले आहे. "हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आतापर्यंत काय अ‍ॅक्शन घेतली, यासंदर्भात CJI ने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तरही मागितले आहे. आता पुढील सुनावणी 28 जुलैला होार आहे.

अमित शाहंचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना निर्देश -
यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडिओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, असे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना विचारले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोद सुरू आहे.

Web Title: The entire country was shaken by the Manipur incident Prime Minister angry SC seeks answer information taken by Amit Shah on manipur video incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.