काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 06:34 PM2024-10-10T18:34:46+5:302024-10-10T18:36:21+5:30

Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता नॅशनल कॉन्फ्रन्सने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सत्ता स्थापन करण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाचं बळ आणखी वाढलं आहे.

The equation has changed in Kashmir, the National Conference has achieved the majority on its own, will it leave the support of the Congress? | काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?

काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता नॅशनल कॉन्फ्रन्सने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सत्ता स्थापन करण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाचं बळ आणखी वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या चार अपक्ष आमदारांनी नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फ्रन्सच्या आमदारांची संख्या ४६ एवढी झाली आहे. तसेच बहुमताजवळ पोहोचल्याने नॅशनल कॉन्फ्रन्सला आता सरकार चालवण्यासाठी काँग्रेसवर फारसं विसंबून राहावं लागणार नाही. मात्र बहुमत मिळालं तरी काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचं नॅशनल कॉन्फ्रन्सनं स्पष्ट केलं आहे.

आज नॅशलन कॉन्फ्रन्समध्ये प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्यारेलाल शर्मा, सतीश शर्मा, चौधरी अक्रम सुरनकोटे आणि रामेश्वर सिंह यांचा समावेश आहे. यामधील काही अपक्ष आमदार हे भाजपाच्या बलाढ्य उमेदवारांना पराभूत करून विजयी झाले होते. जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये निवडून येणारे ९० आणि नायब राज्यपालांकडून नियुक्त होणारे ५ असे एकूण ९५ सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने ४९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या आघाडीकडे सभागृहात स्पष्ट बहुमत आहे. 

दरम्यान, नॅशनल कॉन्फ्रन्सच्या नवनियुक्ती सदस्यांची आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले की, पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये  उमर अब्दुल्ला यांची एकमताने विधिमंडळ सदस्य दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. आता सरकार स्थापनेची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी निवडणूक पूर्व आघाडीतील मित्रपक्षांची शुक्रवारी चर्चा करण्यात येईल.  

Web Title: The equation has changed in Kashmir, the National Conference has achieved the majority on its own, will it leave the support of the Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.