बर्फात साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; श्रीनगरमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:47 PM2022-02-20T21:47:23+5:302022-02-20T21:53:34+5:30

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी श्रीनगरमध्ये कार्यरत आहे.

The equestrian statue of Chatrapati Shivaji Maharaj embodied in the snow; In Srinagar | बर्फात साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; श्रीनगरमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंती

बर्फात साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; श्रीनगरमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात साजरी केली शिवजयंती

googlenewsNext

- राम मगदूम

गडहिंग्लज :जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त गडहिंग्लजचे जवान प्रदीप तोडकर यांनी १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. त्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी श्रीनगरमध्ये कार्यरत आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील प्रदीप तोडकर हे त्याठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी मोठ्या कल्पकतेने यावर्षी बर्फात पुतळा साकारला होता.

मुंबईचे जवान अशोक रगडे यांनीही सहकार्य केले. शनिवारी (१९) सकाळी १० वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते बर्फातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जवानांनी सामूहिक आरती व शिवगर्जना सादर केली. त्यामुळे कॅम्पचा संपूर्ण परिसर रोमांचित झाला.

जपला मराठी बाणा

पाकिस्तानच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर मराठा बटालियनची तुकडी कार्यरत आहे. त्याठिकाणी सध्या उणे २५ अंश इतके तापमान आहे. तरीदेखील भारतीय सैनिकांनी जिद्दीने शिवजयंती साजरी करून मराठाबाणा जपला.

मराठी सण होतात साजरे

श्रीनगरमधील मराठा बटालियनतर्फे दरवर्षी गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, होळीसह सर्व मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यात सर्व अधिकारी व जवान सक्रीय सहभागी होतात.
 

Web Title: The equestrian statue of Chatrapati Shivaji Maharaj embodied in the snow; In Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.