गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:35 AM2022-09-07T10:35:54+5:302022-09-07T10:39:12+5:30

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.  

the exodus of villagers Flood of poisonous red ants Incidents in Odisha | गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

googlenewsNext

भुवनेश्वर : ओडिशातील एका गावाचे जनजीवन विषारी लाल मुंग्यांनी अक्षरश: ठप्प केले आहे. मुंग्यांचा प्रादुर्भाव एवढा प्रचंड आहे, की पाय ठेवायलाही जागा नाही. कुठे साधे बसायचे म्हटले तरी स्वत:भोवती कीटकनाशकाने वर्तुळ काढावे लागते. परिस्थिती एवढी भयंकर झाली आहे, की काही कुटुंबे चक्क गाव सोडून दुसरीकडे राहण्यास गेली आहेत.  

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.  

मुंग्यांनी जिणे केले नकोसे
यापूर्वीही गावाला पुराचे तडाखे बसले आहेत. परंतु असे कधी घडले नाही, असे लोकनाथ दास यांनी सांगितले. या मुंग्यांनी आमचे जिणे नकोसे केले आहे. आम्हाला जेवण करणे, झोपणे एवढेच नाहीतर बसणेही कठीण झाले आहे, असे रेणुबाला दास यांनी सांगितले. 

पुरामुळे मुंग्या गावाकडे
या मुंग्या नदीचा तटबंध व झाडा-झुडपांत राहतात. पुराचे पाणी त्यांच्या अधिवासात शिरल्याने त्या गावात आल्या आहेत, असे ओयूएटीचे वैज्ञानिक संजय मोहंती यांनी सांगितले. ही आपत्ती दूर करण्यासाठी राणी मुंग्या शोधून त्यांना ठार करण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले

- अशा मुंग्या या भागात नवीन नाहीत. परंतु त्या जनजीवन विस्कळीत करतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, असे गटविकास अधिकारी रश्मिता नाथ यांनी सांगितले. मुंग्यांनी चावा घेतल्यानंतर त्वचेला सूज येऊन जळजळ होते. सर्वत्र मुंग्यांच मुंग्या आहेत. तेथे कीटकनाशक फवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 

Web Title: the exodus of villagers Flood of poisonous red ants Incidents in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Odishaओदिशा