Railway: मुलाला कडेवर घेऊन भरधाव ट्रेनसमोर उभे राहिले वडील, समोर आलं अजब कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:41 PM2022-08-17T16:41:27+5:302022-08-17T16:42:02+5:30
Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे मुलाचा बहिरेपणा दूर करण्यासाठी अजब उपायाचा अवलंब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या लहान मुलाचा बहिरेपणा दूर व्हावा यासाठी एक वडील त्या मुलाला घेऊन धावत्या ट्रेनसमोर उभे राहिले.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे मुलाचा बहिरेपणा दूर करण्यासाठी अजब उपायाचा अवलंब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या लहान मुलाचा बहिरेपणा दूर व्हावा यासाठी एक वडील त्या मुलाला घेऊन धावत्या ट्रेनसमोर उभे राहिले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ट्रेन थांबवून ड्रायव्हरने मुलाच्या वडिलांना ट्रॅकमधून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला.
उन्नाव जिल्ह्यातील गंजमुरादाबाद येथे एका वडील त्यांच्या मुलाला घेऊन कानपूर-बालामाऊ पॅसेंजरसमोर उभे राहिले. त्यामुळे गोंधळ उडाला. मुलाला कडेवर घेऊन वडील ट्रेनचा हॉर्न ऐकवण्यासाठी ट्रेनसमोर उभे राहिले होते. त्यानंतर ड्रायव्हरने ट्रेन थांबवून वडिलांना ट्रॅकवरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाला हॉर्न ऐकवल्याशिवाय ट्रॅकवरून हटणार नसल्याचे वडिलांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यानंतर ड्रायव्हरने हॉर्न वाजवून वडिलांची इच्छा पूर्ण केली. या सर्व गडबडीत ट्रेन पाच मिनिटे लेट झाली. जेव्हा ड्रायव्हरने हॉर्न वाजवून वडिलांची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर हे वडील रेल्वे ट्रॅकवरून बाजूला झाले. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली. ऐकू न येणाऱ्या मुलाचा बहिरेपणा दूर कऱण्यासाठी वडिलांनी जीव धोक्यात घालून हा प्रकार केला होता.
हा प्रकार बांगरमऊ येथील गंजमुरादाबाद हॉल्टजवळ सकाळी घडला. सदर मुलाला ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्याचा बहिरेपणा दूर करण्यासाठी वडिलांनी एका अजब उपायाची मदत घेतली. जर ट्रेनचा हॉर्न वारंवार ऐकवला गेला तर मुलाचा बहिरेपणा दूर होईल आणि तो ऐकू लागेल, असे वडिलांना वाटत होते. त्यातून त्यांनी हा जीवावर बेतणारा उपाय करून पाहिला.