‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 05:54 AM2024-07-07T05:54:36+5:302024-07-07T05:54:51+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत हाेणार आहे.

The first budget of the third tenure of the Medi government will be presented on July 23 | ‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

नवी दिल्ली : माेदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प २३ जुलै राेजी सादर हाेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. यापूर्वी माेरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला हाेता.
 
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजुजू यांनी यासंदर्भात माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत हाेणार आहे. लाेकसभा निवडणुकीमुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला हाेता. 

सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम काेणत्या अर्थमंत्र्यांच्या नावे?

सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माेरारजी देसाई यांच्या नावे आहे. पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी ९ वेळा, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख आणि यशवंत सिन्हा यांनी ७, तर मनमाेहन सिंग आणि टी. कृष्णमाचारी यांनी ६ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.
 

Web Title: The first budget of the third tenure of the Medi government will be presented on July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.