देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 08:15 PM2024-09-09T20:15:36+5:302024-09-09T20:16:45+5:30
संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे.
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यासंदर्भात स्वतः केंद्र सरकारने पुष्टी केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक अॅडव्हायजरीही जारी केला आहे. एमपॉक्स व्हायरसची लागण झालेल्या परदेशातून परतलेल्या एक व्यक्तीला रुग्णालयात अलग ठेवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे.
पश्चिम आफ्रिकेतील क्लेड-2 एमपॉक्स व्हायरस आढळला -
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष व्यक्ती नुकतीच मंकीपॉक्स संक्रमणाचा सामना करत असलेल्या देशातून परतली आहे. तिला एमपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, एमपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी प्रवासाशी संबंधित संक्रमणाच्या स्वरुपात करण्यात आली आहे. लॅबने रुग्णाला पश्चिम आफ्रिकन क्लेड-2 च्या एमपॉक्स व्हायरसची लागण झाल्यची पुष्टी केल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.
WHO च्या अहवालाचा भाग नाही -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हे एक वेगळे प्रकरण आहे. जे जुलै 2022 पासून भारतात रिपोर्ट करण्यात आलेल्या आधिच्या 30 प्रकरणांसारखे आहे. हे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा (WHO चा अहवाल) भाग नाही. जो Mpox च्या Clade 1 संदर्भात आहे.
#UPDATE | The previously suspected case of Mpox (monkeypox) has been verified as a travel-related infection. Laboratory testing has confirmed the presence of Mpox virus of the West African clade 2 in the patient. This case is an isolated case, similar to the earlier 30 cases… https://t.co/R7AENPw6Dwpic.twitter.com/ocue7tzglR
— ANI (@ANI) September 9, 2024
एमपॉक्स संक्रमण असलेल्या देशातून आला रुग्ण -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लया माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने MPOX संसर्ग असलेल्या देशातून आली आहे. रुग्णाला आयसोलेशनसाठी एका रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. एमपीओएक्सची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे. याशिवाय संबंधित रुग्णाला कसल्याही प्रकारचा आजार नाही.