श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:16 AM2024-01-23T08:16:49+5:302024-01-23T08:17:25+5:30
अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे
अयाेध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे, ज्यामुळे श्रीरामलल्लांच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचा स्पर्श हाेईल. या अद्भुत घटनेचे सुमारे ६ मिनिटे दर्शन घेता येईल. जाणून घेऊ या ही यंत्रणा कशी कार्य करते...
-मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर शिखराजवळ ‘ऑप्टाेमेकॅनिकल’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला ‘सूर्य तिलक’ असे नाव दिले आहे. सूर्यप्रकाश श्रीरामलल्लांच्या ललाटी आणण्यासाठी प्रकाशाचा मार्ग परावर्तित करण्यात येईल.
-सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतील. ती या उपकरणाच्या लेंसवर पडतील. तेथून ती परावर्तित करण्यात येतील. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक काेनात बसविण्यात आला आहे.
-परावर्तित किरणे एका छाेट्या अंतर्गत बाेगद्यातून पहिल्या माळ्यावर गाभाऱ्यापर्यंत पाेहाेचतील.
-गाभाऱ्याच्या बाहेर एक आरसा ठरावीक काेनात बसविलेला आहे. तेथून सूर्यकिरणे परावर्तित हाेऊन श्रीरामलल्लांच्या कपाळाला स्पर्श करतील. हे विलाेभनीय दृश्य श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता पाहता येईल