"असामचं भविष्य असुरक्षित, आम्ही अल्पसंख्याक झालोय", हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 03:39 PM2024-08-15T15:39:46+5:302024-08-15T15:40:49+5:30
Himanta Biswa Sarma News: आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन केल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सरमा म्हणाले की, आता आसाममधील मुळनिवासी हे बचावात्मक भूमिकेत गेले आहेत. आसाममधील बारा तेरा जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. असामचं भविष्य आमच्यासाठी सुरक्षित राहिलेलं नाही. संपूर्ण राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येमधील संतुलन हे वेगाने संपुष्टात येत आहे. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या २०२१ मध्ये वाढून ४१ टक्के झाली आहे. तर हिंदू लोकसंख्या घटून ५७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. उर्वरित लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन आणि इतरांचा समावेश आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अधिकृत भाषणांमधून दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, हिंदू लोकसंख्या ६०-६५ टक्क्यांवरून घटून ५० टक्क्यांपर्यंत येत आहे, ही चिंतेची बाब आहे. हा काळ संकटाचा आहे. मी लोकसंख्येचं संतुलन प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सर्व हिंदू, मुस्लिम आणि इतरांना कुटुंब नियोजना संबंधीच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन करतो. तसेच समाजातील प्रत्येक वर्गात होणाऱ्या बहुविवाहाबाबत आपण सतर्क राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं ही, आम्ही १२-१३ जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक झालो आहोत. जर भक्कम सरकार नसेल तर मुलनिवासींसाठी प्रत्येक पावलावर संकट असेल. मी सूर्याचा प्रकाश नाही. पण मुलनिवासींच्या हितांच्या रक्षणासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मेणबत्तीप्रमाणे उभा राहीन, असेही त्यांनी सांगितले.