मुलीला विंडो सीटवर बसायचंय, प्लीज सीट बदलता...? एका अदला-बदलीने ओडिशा रेल्वे अपघातात वाचला बाप-लेकिचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 10:34 AM2023-06-04T10:34:58+5:302023-06-04T10:36:20+5:30
कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे.
भुवनेश्वर - "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती", ही म्हण एक बाप-लेकीला अगदी फीट बसते. हे लोक शुक्रवारी कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होते. खरे तर, ही नशिबाचीच कमाल म्हणावी लागेल की, एम के देब आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी स्वाती यांनी प्रवासादरम्यान आपल्या सीटची अदलाबदल केली. यामुळे त्यांनी अखेरच्या क्षणी मृत्यूला मात दिली. कारण त्यांचे तिकीट ज्या कोचमध्ये होते, तो कोच अत्यंत वाईट पद्धतीने अपघातग्रस्त झाला आहे. यातील अधिकांश लोकांचा मृत्यू झाला आहे.
खरे तर एम के देब आणि त्यांची मुलगी खडगपूर येथून ट्रेनमध्ये बसले होते आणि त्यांना कटकमध्ये उतरायचे होते. कारण शनिवारी त्याची एका डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचे तिकीट होती. मात्र मुलीने खिडकीत बसण्याचा आग्रह केला होता. देब म्हणाले, आमच्याकडे विंडो सीट तिकीट नव्हते. त्यामुळे आम्ही टीसीला विनंती केली. यावर, जर शक्य असेल तर ते इतर प्रवाशांसोबत आपले तिकीट अदलाबदल करू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर आम्ही दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि दोन जणांना विनंती केली. ते राजी झाले. यानंतर ते आमच्या मुख्य कोचमध्ये गेले आणि आम्ही त्यांच्या कोचमध्ये आलो. जे आमच्या सीटपासून तीन कोट दूर होते.
सुदैवाने बचावले -
या दोघांनी सीट बदलल्यानंतर काही वेळाने भयंकर ट्रेन अपघात झाला. या अपघातात जवळपास 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ज्या कोचमधून या बाप-लेकीची जोडी प्रवास करत होती त्या कोचचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र ज्या कोचमध्येचे त्यांचे तिकीट होते, त्या कोचचे प्रचंड नुकसान जाले. यातील अनेकांचा मृत्यू झाला.
'चमत्कारासाठी देवाचे आभार' -
देब म्हणाले, आमच्यासोबत जागा बदलण्यास तयार झालेल्या दोन प्रवाशांच्या स्थितीसंदर्भात आम्हाला माहीत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, या चमत्कारासाठी देवाचे आभारी आहोत. आमच्या डब्यातील जवळपास सर्वच प्रवासी सुखरूप होते.
देब म्हणाले, किरकोळ जखमी झालेले लोक आणि आपली मुलगी स्थानिक लोकांच्या मदतीने शनिवारी सकाळच्या सुमारास कटक येथे पोहोचलो. मुलीच्या डाव्या हाताला फोट आला आहे. तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. यावेळी, बाल रोग तज्ज्ञ विक्रम सामल म्हणाले, जेव्हा मला हे दोघे अगदी चमत्कारिकपणे बचावल्याचे समजले, तेव्हा माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नव्हते. अपघातानंतर, कोचमध्ये पडूनही त्यांना किरकोश मार लागला आहे.