खूशखबर! रोजगार वाढ भरमसाठ हाेणार; अधिक संधी कुठे वाढताहेत?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:03 AM2022-06-04T07:03:50+5:302022-06-04T07:04:20+5:30

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर बाजाराची स्थिती सुधारली आहे. मागणीत मोठी वाढ झाली आहे.

The good news is that there will be huge employment growth | खूशखबर! रोजगार वाढ भरमसाठ हाेणार; अधिक संधी कुठे वाढताहेत?, पाहा

खूशखबर! रोजगार वाढ भरमसाठ हाेणार; अधिक संधी कुठे वाढताहेत?, पाहा

Next

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत अकुशल कामगार (ब्ल्यू कॉलर) आणि कुशल कामगार (ग्रे कॉलर) यांच्या रोजगारात ७३ टक्के वाढ झाली आहे. रोजगारात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. 

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर बाजाराची स्थिती सुधारली आहे. मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाल्याने मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. रोजगार वृद्धीत बीपीओ/कस्टमर केअर, घरपोच वितरण, डेटा एंट्री/बॅक ऑफिस, फिल्ड सेल्स आणि किरकोळ/काउंटर विक्री या क्षेत्रांची हिस्सेदारी सर्वाधिक आहे. या श्रेणींचा एकूण उपलब्ध रोजगारातील वाटा ८० टक्के आहे. 

संधी कुठे वाढताहेत? 

टिअर-२ आणि टिअर-३ शहरांत रोजगाराच्या अधिक संधी सातत्याने वाढताना दिसत आहेत. 

५७% रोजगार

इच्छुक पदवीधर अथवा त्यापुढील शिक्षण घेतलेले आहेत. याचाच अर्थ अकुशल व कुशल कामगारांच्या बाबतीत शिक्षित मनुष्यबळ कंपन्यांना उपलब्ध आहेत.

Web Title: The good news is that there will be huge employment growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.