'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 02:42 PM2024-02-26T14:42:19+5:302024-02-26T14:44:07+5:30

The Great Khali: शेतकरी आंदोलनावरही खलीने प्रतिक्रिया दिली. काय म्हणाला पाहा...

'The Great Khali' Praises PM Narendra Modi; He said - '400 will definitely happen' | 'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

The Great Khali: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmer Protest) सुरू आहे. यावर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रसिद्ध कुस्तीपटू आणि माजी WWE स्टार दलीप सिंग राणा उर्फ ​'​द ग्रेट' (The Great Khali) खली यानेही या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक केले. 

मध्य प्रदेशातील बैतुल येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी ग्रेट खली याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी देशभरातील पुरुष व महिला पैलवान सहभागी झाले आहेत. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी बैतुलमध्ये दाखल होत आहेत. 

काय म्हणाला खली...
दरम्यान, यावेळी मीडियाशी बोलताना द ग्रेट खलीने देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. 'थोडे फार शेतकरी काही लोकांच्या बोलण्यात येतात. पंतप्रधान मोदींनी केलेल्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्या क्वचितच पूर्वी मिळाल्या. शेतकरी फसवणुकीचे बळी ठरत आहेत, अशी प्रतिक्रिया खलीने दिली.

400 पार नक्की होणार...
यावेळी खलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मोदींचा 400 पारचा नारा पूर्ण होणार आहे. पंतप्रधानांनी देशात मोठा विकास केला, त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. पंतप्रधानांनी भारतासाठी जे काम केले, ते यापूर्वी कोणी केले असेल असे मला वाटत नाही. पंतप्रधान मोदीजींनी समाजासाठी विचार केला, शेतकऱ्यांसाठी विचार केला, त्यामुळे यावेळी 400 चा आकडा पार करणार आहे. भारतीय कुस्ती आणि इतर खेळांमध्येही बरीच सुधारणा झाली आहे. सरकार सतत सहकार्य करत आहे, अशा भावना खलीने व्यक्त केल्या.

Web Title: 'The Great Khali' Praises PM Narendra Modi; He said - '400 will definitely happen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.