दिल्लीत प्रदूषणाचा कहर! आजपासून शाळा बंद, मेट्रो फेऱ्या वाढवणार, ग्रॅप-3 लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:22 AM2023-11-03T09:22:38+5:302023-11-03T09:23:16+5:30

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गुरुवारी या हंगामात पहिल्यांदाच 'गंभीर' श्रेणीत पोहोचली.

The havoc of pollution in Delhi! Schools closed from today, metro trips will be increased, Grap-3 will be implemented | दिल्लीत प्रदूषणाचा कहर! आजपासून शाळा बंद, मेट्रो फेऱ्या वाढवणार, ग्रॅप-3 लागू

दिल्लीत प्रदूषणाचा कहर! आजपासून शाळा बंद, मेट्रो फेऱ्या वाढवणार, ग्रॅप-3 लागू

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदुषण वाढले आहे, आज सकाळी संपूर्ण दिल्लीत मोठ्या प्रमाणात फॉग झाल्याचे दिसायला मिळाले. यामुळे रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास जाणवला. समोरुन येणारी वाहणे दिसत नव्हती. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रात्री वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. 

ईडी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा नव्याने समन्स पाठवणार; तपास यंत्रणेन सांगितलं कारण

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी गुरुवारी या हंगामात पहिल्यांदाच 'गंभीर' श्रेणीत पोहोचली. येत्या दोन आठवड्यांत प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'प्रदूषणाची वाढती पातळी पाहता दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा पुढील दोन दिवस बंद राहतील. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने एका वेगळ्या आदेशात म्हटले आहे की, त्यांच्या शाळांमधील वर्ग पुढील दोन दिवस चालणार नाहीत. 

अधिक लोकांना दिल्ली आणि शेजारच्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, दिल्ली मेट्रो ट्रेन ३ नोव्हेंबरपासून २० अतिरिक्त फेऱ्या करणार आहे. DMRC ने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी GRAP च्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने, DMRC उद्यापासून म्हणजेच ३ नोव्हेंबर पासून ट्रेनच्या २० अतिरिक्त ट्रिप आपल्या नेटवर्कवर करेल. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ४०२ होता. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आयोगाने फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा लागू केला. दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळ्याच्या काळात GRAP लागू केला जातो.

एमसीडीने सांगितले की, एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनच्या आदेशानुसार, दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागातील सर्व एमसीडी आणि एमसीडी-अनुदानित शाळांमध्ये ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन माध्यमातून वर्ग आयोजित केले जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी शाळा खुल्या राहतील.

दिल्लीतील ३७ मॉनिटरिंग स्टेशन्सपैकी किमान १८ ने 'गंभीर' श्रेणीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला आहे. पंजाबी बाग (४३९), द्वारका सेक्टर-८ (४२०), जहांगीरपुरी (४०३), रोहिणी (४२२), नरेला (४२२), वजीरपूर (४०६), बवाना (४३२), मुंडका (४३९), आनंद विहार (४५२) आणि न्यू मोतीबाग (४०६) सह शहरातील अनेक भागात हवेची गुणवत्ता पातळी 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे.

Web Title: The havoc of pollution in Delhi! Schools closed from today, metro trips will be increased, Grap-3 will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.