पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला गेला होता पती, परतला तर सुरू झाली पोटदुखी; X-Ray पाहून डॉक्टर थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:07 AM2023-01-21T11:07:05+5:302023-01-21T11:08:03+5:30
सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सुसुरवाडिला गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ग्लास टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकारात डॉक्टरांनी पीडित युवकाचा जीव वाचवला आहे. सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
भेटायला जाणे पडले महागात -
पीडित व्यक्तीची प्रकृती आता स्थीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबगंजमधील रामपूरच्या असली गावचा रहिवासी पत्नीला भेटण्यासाठी 15 दिवसांपूर्वी ससुरवाडीला गेला होता. तेथे झालेल्या राक्षसी कृत्याची त्याला भनकही नव्हती. घटनेनंतर त्याच्या पोटात दुखू लागले आणि शौचासही त्रास होऊ लागला. यानंतर तो स्थानिक डक्टरांकडे उपचार घेण्यासाठी गेला. डॉक्टर म्हणाले गॅसमुळे पोट दुखत आहे. मात्र काही दिवस औषध घेऊनही पोटदुखी कमी झाली नाही, म्हमून तो एसकेएमसीएचला पोहोचला. येथे डॉक्टरांनी एक्स रे काढला तेव्हा त्याच्या पोटात ग्लास असल्याचे निदर्शनास आले. हा ग्लास आतडी आणि प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला होता.
हैदराबादवरून बिराहला आला होता युवक -
पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तो हैदराबादमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करतो. तो आपल्या पत्नीकडे बिहारला गेला होता. मात्र, तो पोहोचल्यानंतर त्याची पत्नी अचानकपणे रुसून माहेरी निघून गेली. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांत अशा दोन घटना घडल्या आहेत. यात एका पुरुषाच्या आणि एका महिलेच्या पोटात स्टिलचा ग्लास काढण्यात आला. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तसेच पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांमध्ये जबरदस्त संताप दिसत आहे.