हवाई दलाला आता मिळणार प्रचंड ‘तेज’स, ९७ विमाने, १५० हेलिकॉप्टरची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 05:57 AM2023-12-01T05:57:30+5:302023-12-01T05:58:16+5:30
Indian Air Force: देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे २.२३ लाख कोटींच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली.
नवी दिल्ली - देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे २.२३ लाख कोटींच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली. त्यामध्ये ९७ तेजस विमाने आणि १५० प्रचंड हेलिकॉप्टरची खरेदी तसेच सुखोई लढाऊ विमानांचा ताफा अद्ययावत करण्यासही मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी ९८ टक्के खरेदी ही देशांतील उत्पादकांकडून करण्यात येईल.
हवाई दल आणि आर्मीला तेजस विमान आणि प्रचंड हेलिकॉप्टरची खरेदी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) केली जाणार आहे. तसेच सुखोई विमानांचा ताफा अद्ययावत करण्याचे कामही एचएएलला मिळाले आहे.
तेजसचा ताफा १८० होणार
संरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबत ४८ हजार कोटींचा करार केला होता. ती २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होतील. आता आणखी ९७ विमाने खरेदी केली जाणार असल्याने तेजसचा ताफा १८० विमानांचा होणार आहे. ती मिग-२१ विमानांची जागा घेतील.
कोणते प्रस्ताव मंजूर
- अँटीटँक युद्धसामग्री खरेदी
- टी-९० रणगाड्यांसाठी ऑटोमॅटिक टार्गेट ट्रॅकर आणि डिजिटल बॅलेस्टिक कॉम्प्युटर खरेदी
-नौदलासाठी मध्यम श्रेणीतील अँटी-टँक मिसाइलची खरेदी.