ISROची अंतराळात मोठी झेप, ३६ उपग्रहांसह सर्वात वजनदार LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:35 AM2023-03-26T09:35:24+5:302023-03-26T09:36:56+5:30

इस्रोनं (ISRO) ३६ वनवेब इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून आणखी एक इतिहास रचला आहे. पाहा व्हिडीओ.

The Indian Space Research Organisation ISRO launched India s largest LVM3 rocket carrying 36 satellites satish dhawan space center | ISROची अंतराळात मोठी झेप, ३६ उपग्रहांसह सर्वात वजनदार LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

ISROची अंतराळात मोठी झेप, ३६ उपग्रहांसह सर्वात वजनदार LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

googlenewsNext

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं (ISRO) ३६ वनवेब इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे सर्वात वजनदार लाँच रॉकेट, लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-III) लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित करण्यात आलं. सकाळी ८.३० वाजल्यापासून रॉकेट लाँच करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. फेब्रुवारीमध्ये SSLV-D2/EOS07 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर २०२३ मधील इस्रोची ही दुसरी यशस्वी कामगिरी आहे.

अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंच इस्रोच्या रॉकेटनं ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केलं. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केलं त्यांचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोनं ट्वीट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती.



७२ उपग्रह लाँच करण्याचा करार
LVM3 हे इस्रोचं सर्वात वजनदार प्रक्षेपण यान आहे ज्यानं चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत. खरं तर, ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीनं ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता.

कोण आहे वन वेब कंपनी?
एअरटेल म्हणजेच भारती एंटरप्रायझेस ही ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वन वेबमध्येही शेअरहोल्डर आहे. इस्रोचे वनवेबसोबत दोन करार आहेत, त्यापैकी एक गेल्या वर्षी झाला होता. या रॉकेटमधून दुसऱ्यांदा खासगी कंपनीचा उपग्रह वाहून नेण्यात आले असून याचा सक्सेस रेट १०० टक्के आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही इस्रोने LVM3 रॉकेटने वनबेसचे ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते.

Web Title: The Indian Space Research Organisation ISRO launched India s largest LVM3 rocket carrying 36 satellites satish dhawan space center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.