हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:15 PM2022-03-14T23:15:21+5:302022-03-14T23:16:35+5:30

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

the kashmir files 2022 movie tax free in uttar pradesh yogi adityanath cm anupam kher | हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

Next

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. यापूर्वी हा चित्रपट हरियाणा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यावर चित्रपटगृहातून भावूक होऊनच प्रेक्षक बाहेर पडत आहेत. या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट बनवल्याबद्दल विवेक अग्निहोत्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर आणण्याची तयारी सुरू आहे.

चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याआधीही विवेक अग्निहोत्रीने जेव्हा 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपट आणला होता तेव्हा लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता या चित्रपटाला ज्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं दिसत आहे. 

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दमदार कामगिरी
विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी किती वेळ लागला आणि किती मेहनत घेतली हे सांगितले. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटाने 3 दिवसांत एकूण 27.15 कोटींची कमाई केली आहे. ही अतिशय चांगली सुरुवात मानली जात आहे. चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करेल. सध्या चित्रपट पाहण्यासाठी तिकीटच मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

Web Title: the kashmir files 2022 movie tax free in uttar pradesh yogi adityanath cm anupam kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.