"ती कथ्थक नृत्यांगना आहे; विमानात तक्रारदार महिलेने स्वत:वरच लघुशंका केली"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:26 AM2023-01-14T11:26:17+5:302023-01-14T11:26:25+5:30
एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शंकर मिश्रा यांच्या वकिलाने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
नवी दिल्ली : एअर इंडियाच्याविमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शंकर मिश्रा यांच्या वकिलाने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘तक्रारदार महिलेची सीट ब्लॉक करण्यात आली होती. शंकर मिश्रा यांना तिथे जाणे शक्य नव्हते. आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:वरच लघुशंका केली. ती कथ्थक नृत्यांगना आहे. ८० टक्के कथ्थक नर्तकांना ही समस्या आहे,’ असा युक्तिवाद त्यांनी दिल्ली न्यायालयात केला.
वडिलांचे मत वेगळेच
आरोपीचे वडील श्याम मिश्रा म्हणाले होते की, माझ्या मुलावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. पीडितेने भरपाई मागितली होती. तीही आम्ही दिली. मग काय झाले माहीत नाही. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे केले जात असल्याची शक्यता आहे. शंकरला विमानात त्याला पेय देण्यात आले. माझा मुलगा सभ्य आहे आणि असे काही करू
शकत नाही.