अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:13 AM2024-01-22T08:13:59+5:302024-01-22T08:14:26+5:30

दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे.

The litigants Paramhans and Hashim Ansari used to ride in the same rickshaw to the court | अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार महंत परमहंस रामचंद्र दास आणि हाशिम अंसारी यांच्यातील मैत्री म्हणजे एक काेडेच आहे. जमिनीच्या वादात दाेघेही १९४९ पासून न्यायालयात एकमेकांसमाेर उभे राहिले आहेत. मात्र, बाहेर त्यांच्या आदर्श मैत्रीची चर्चा कायम हाेती.

परमहंस आणि हाशिम हे एकाच रिक्षातून किंवा टांग्यातून न्यायालयात पाेहाेचायचे. दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे. जवळपास ६ दशकांपर्यंत त्यांची अशीच मैत्री राहिली. मात्र, २००३ मध्ये परमहंस यांचे निधन झाले व ही मैत्री कायमची तुटली. अंसारी यांचा २०१६ मध्ये वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला. मैत्रीची ही परंपरा त्यांचा मुलगा इकबाल याने कायम ठेवली.

‘श्रीरामांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे’ 

अन्सारी यांचे पुत्र इक्बाल हेदेखील खटल्यातील पक्षकार हाेते. प्राणप्रतिष्ठा साेहळ्यापूर्वी त्यांनी सर्व रामभक्तांचे स्वागत केले. अध्याेध्या ही धर्म नगरी आहे. सर्वांनी यावे. प्रभू श्रीरामांचे दर्शन करावे व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे. आपसात शत्रुता नकाे, हीच शिकवण सर्व धर्म देतात, असे ते म्हणाले.

Web Title: The litigants Paramhans and Hashim Ansari used to ride in the same rickshaw to the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.