मलेरिया पॅरासाइट डासाच्या शरीरातच होणार नष्ट; प्रभावी संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:38 AM2023-04-25T07:38:57+5:302023-04-25T07:39:33+5:30

जेएनयूमध्ये झाले संशोधन; एल-१७१ रसायन ठरले प्रभावी

The malaria parasite will be destroyed in the body of the mosquito itself | मलेरिया पॅरासाइट डासाच्या शरीरातच होणार नष्ट; प्रभावी संशोधन

मलेरिया पॅरासाइट डासाच्या शरीरातच होणार नष्ट; प्रभावी संशोधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मलेरियाच्या पॅरासाइटने आता स्वत:त काही बदल केले आहेत. त्याचे आता थंड वातावरणातही उत्परिवर्तन होऊ लागले आहे. त्यामुळे त्याच्यापासून मानवी आरोग्याला असलेला धोका आणखी वाढला आहे. एल-१७१ या रसायनाद्वारे या पॅरासाइटला डासाच्या शरीरामध्येच नष्ट करता येऊ शकते, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

मलेरिया पॅरासाइट स्वत:ला कोल्ड शॉक प्रोटीनमध्ये विकसित करत असताना १५ ते २१ अंश सेल्सियस तापमानातदेखील जिवंत राहून उत्परिवर्तन घडवतो. ही बाब जगात प्रथमच संशोधनातून सिद्ध झाली असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

चार तासांतच दिसतो रसायनाचा प्रभाव
जर्मनीचे संशोधक क्रिस्टोफ अरेंज यांनी उपलब्ध करून दिलेल्या ‘एल-१७१’ रसायनाच्या डोसनंतर चार-पाच तासांतच डासाच्या शरीरातील मलेरियाचा पॅरासाइट नष्ट होतो. या रसायनाचा उपयोग कॅन्सरवरील औषधे बनविण्यासाठीही केला जातो.

मलेरिया पॅरासाइटवर दीड वर्षे केले संशोधन
जेएनयूमधील स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसिन या संस्थेतील प्रा. शैलजा सिंह, डॉ. अंकिता बहल, रुमाएशा शोएब या संशोधकांनी मलेरिया पॅरासाइटवर सुमारे दीड वर्षे संशोधन केले.

संशोधन काय?
nडास चावल्यानंतर त्याच्यामार्फत मलेरियाच्या पॅरासाइटचा माणसाच्या शरीरात प्रवेश होतो. 
nमलेरियाचा पॅरासाइट या तापमाना- पर्यंत जिवंत राहून आजार पसरवत होता. मात्र, आता कोल्ड शॉक प्रोटीन बनवून १५ ते २१ अंश सेल्सियस तापमानातही त्याचे उत्परिवर्तन होत असल्याने मलेरियाबाबतचा धोका आणखी वाढला असल्याचे संशोधकांनी म्हटले.

भारतामध्ये मलेरियाचे रुग्ण

वर्ष     रुग्णसंख्या    मृत्यू
२०१८    ४२९९२८    ९६
२०१९    ३३८४९४    ७७
२०२०    १८६५३२    ९३ 
२०२१    १६१७५३    ९०
२०२२    १७३९७५    ६४

(२०१८ ते २०२२ मधील मलेरियाच्या रुग्णांविषयी नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वेबसाइटवर दिलेली आकडेवारी)

केंद्र सरकारचे घेणार सहकार्य  
संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान खात्याला सहकार्य करण्याची विनंती संशोधक करणार आहेत.

 

 

Web Title: The malaria parasite will be destroyed in the body of the mosquito itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.