भारत-बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची भेट, भेटीपेक्षा त्यांच्यामागील फोटोचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:00 PM2023-04-27T20:00:42+5:302023-04-27T20:02:14+5:30
दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली.
भारत आणि बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी भेट घेतली. बांगलादेशचे लष्करप्रमुख शफीउद्दीन अहमद तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची दिल्लीत भेट घेतली. दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली.
मनोज पांडे आणि एसएम शफीउद्दीन अहमत यांनी ज्या ठिकाणी भेट घेतली त्यांच्या मागे भिंतीवर एक फोचो लावण्यात आलेला आहे. हा फोटो १९७१ मध्ये ढाका मध्ये भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी लष्करानं बिनशर्त सरंडर केलं होतं होतं त्याचा आहे. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका येथील रेस कोर्स मैदानात संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल एएके नियाजी यांनी सरंडर करण्याच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली. त्यांच्या शेजारी भारतीय लष्कराचे तत्कालिन लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा आहेत. त्यावेळी पाकिस्तानच्या तब्बल ९३ हजार सैनिकांनी सरंडर केलं होतं. यानंतर पूर्व पाकिस्तान एक स्वतंत्र देश बांगलादेश बनला.
पाकिस्तानी सैन्यानं सरंडर केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीतील लोकसभेत ढाका ही आता स्वतंत्र बांगलादेशची राजधानी असल्याची घोषणा केली. यासह जगाच्या नकाशावर नवीन देशही आला. विशेष म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांनी ढाका येथील रेसकोर्स मैदानावर जिकडे जनरल नियाझींनी शरणागती पत्करली त्याच मैदानातून एकेकाळी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. यालाच पुढे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूप मिळाले.
भारतीय लष्कराचा विजय
हे भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाचे चित्र आहे. यानंतर एक नवा स्वतंत्र देश निर्माण झाला. या युद्धात भारताचे ३००० सैनिक शहीद झाले, तर १२००० हून अधिक सैनिक जखमी झाले.