आमदाराच्या कारने लोकांना चिरडले, संतप्त जमावाने गाडी फोडली, नेत्यालाही धुतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 03:44 PM2022-03-12T15:44:41+5:302022-03-12T15:51:21+5:30
जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती
ओडिशा - राज्यातील खोरधा जिल्ह्याच्या बानपूर ब्लॉकजवळ काही लोकांनी चिलिका मतदारसंघाचे आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात आमदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार जगदेव यांनी गर्दीत कार घुसवली होती, त्यामुळे अनेकजण जखमी झाले. त्यानंतर संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला केला. जगदेव यांच्या गाडीखाली चिरडल्याने 2 पोलिसांसह 10 जण जखमी झाल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले.
जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती. मात्र, आमदार महाशयांनी गर्दीतच आपली कार घुसवली. त्यामध्ये, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह अनेकजण जखमी झाले. त्यामुळे, संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर, अपघातातील जखमी आणि जगदेव यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Locals vandalize Chilika MLA Prashanta Kumar Jagdev's car after he allegedly rammed his vehicle into crowd at Banapur in Khurda district @NewIndianXpress@XpressOdisha@Siba_TNIEpic.twitter.com/NjGtFWQrm0
— Asish Mehta (@mehta_asish) March 12, 2022
खोरधा पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून शहरात तणाव निर्माण होऊ नये, म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी बीजू जनता दल या पक्षातून प्रशांत कुमार जगदेव यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, खुर्दा जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरुनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
In a bizarre incident just like the #LakhimpurKheri case, #PrasantaKumarJagadev, a legislator of #Odisha Assembly, on Saturday allegedly plowed his car into a crowd at Banapur in Khurda district, police said.@odisha_policepic.twitter.com/1e0YTEkFfj
— IANS Tweets (@ians_india) March 12, 2022