मान्सून परतीच्या प्रवासाकडे, जातानाही बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:36 AM2024-09-23T06:36:49+5:302024-09-23T06:37:20+5:30

मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

The Monsoon rains will start on the way back from Monday | मान्सून परतीच्या प्रवासाकडे, जातानाही बरसणार!

मान्सून परतीच्या प्रवासाकडे, जातानाही बरसणार!

नवी दिल्ली : देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. परतीच्या मान्सूनमुळे दक्षिण आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

महाराष्ट्रात काय?

दुष्काळाचा कायमचा पाहुणा असलेल्या राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त पाऊस झाला. देशात सरासरी ८२.७२ सेंटीमीटर पावसाच्या तुलनेत यंदा ८८.२० सेंटीमीटर पाऊस झाला आहे. मध्य प्रदेशात सामान्यपेक्षा १५% जास्त आणि छत्तीसगडमध्ये ६% जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद

यंदा खरिपाच्या पेरणी क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी खरीप हंगामात १०७२.९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर यंदा १०९६.६५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापूस आणि ताग वगळता तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड धान्य यांसारख्या इतर सर्व पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

लवकर आला, सहा दिवस उशिराने जाणार 

यावेळी केरळ आणि ईशान्य भारतात ३० मे रोजी मान्सूनचे एकाच वेळी आगमन झाले, जे आगमनाच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस आधी होते. मान्सून माघारीची सामान्य तारीख १७ सप्टेंबर असली, तरी तो सहा दिवस उशिरा परतीकडे निघणार आहे. २ जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला.

Web Title: The Monsoon rains will start on the way back from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.