सासू होणाऱ्या जावयासोबत पाच दिवस एकटी रहायला पण गेलेली; पती, मुलीला काहीच वाटले नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:57 IST2025-04-11T15:56:27+5:302025-04-11T15:57:15+5:30
तासंतास हे दोघे फोनवर बोलत रहायचे. त्यांचे प्रेम दुरूनच चालले होते. पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू अनिताने प्लॅन आखला अन् ती पाच दिवस त्याच्यासोबत रहायलाही गेली होती.

सासू होणाऱ्या जावयासोबत पाच दिवस एकटी रहायला पण गेलेली; पती, मुलीला काहीच वाटले नाही...
आपल्या पेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या होणाऱ्या जावयासोबत सासू पळून गेली आणि सर्वत्र तिच्या या विश्वासघातकी वागण्याची चर्चा सुरु झाली. आपल्याच मुलीने संसाराची स्वप्ने रंगविलेली तिला काय वाटेल, याचा जराही विचार तिने केला नाही, एवढी ती आणि होणारा जावई राहुल प्रेमात वेडे झाले होते. या दोघांनी स्वत:ची अब्रू वेशीवर टांगलीच परंतू तरण्याताठ्या मुलीच्याही आयुष्यात भूकंप आणला आहे. आता या सासू-जावयाच्या जोडीबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.
पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हापासून सासूच्या मनात प्रेमाचे चाळे सुरु झाले होते. जावयाला मोबाईल घेऊन देत सासूने पुढचे पाऊल टाकले होते. जावयासोबत सूत जुळताच सासू आणि त्याने भविष्याचेही प्लॅनिंग केले होते. तासंतास हे दोघे फोनवर बोलत रहायचे. त्यांचे प्रेम दुरूनच चालले होते. मग त्यांना एकत्र भेटायची इच्छा झाली. पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू अनिताने प्लॅन आखला अन् ती पाच दिवस त्याच्यासोबत रहायलाही गेली होती.
यांच्या प्रेमसंबंधांना नुकतेच अंकुर फुटले होते. नातेगोते, मुलीचे लग्न, होणारा जावई आदी साऱ्या गोष्टी हे दोघे पुरते विसरले होते. भेटण्यासाठी या दोघांनी एक प्लॅन आखला. राहुल आजारी असल्याचे तिने पतीला आणि मुलीला सांगितले. तसेच मी त्याला जाऊन पाहून येते, असेही ती म्हणाली. आता लग्नाआधीच मुलीला जावयाकडे पाठविणे समाजाला पटणार नाही, याचाच फायदा तिने घेतला आणि आपणच जाऊन येते म्हणून प्रस्ताव मांडला. यामुळे ना पतीने संशय घेतला ना मुलीने.
चालाख असलेली सासूबाई होणारा जावई राहुलला बरे नाही म्हणून चांगली पाच दिवस त्याच्यासोबत एकटी राहिली. पाच दिवसांनी जेव्हा ती परत आली तेव्हा जावईच तिला सोडायला आलेला, पण तो घरी आला नाही. त्यांचे घर असलेल्या गल्लीच्या जवळच्या एका शाळेजवळ त्याने तिला सोडले आणि माघारी निघून गेला. इथे त्यांचा पळून जाण्याचा, एकमेकांसोबत राहण्याचा प्लॅन शिजला होता. यामुळेच जावई घरी न येता प्रियकर जसा प्रेयसीला वाटेत सोडतो तसा सोडून गेला होता. पाच दिवस राहुन आली तरीही मुलीला काही संशय आला नव्हता. पती तर बाहेरच होता. आता पळून गेल्यानंतर साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जावई पूर्वी उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करत होता. प्राथमिक तपासात पोलिसांना, दोघेही बसने उत्तराखंडला निघाल्याचा संशय येत आहे. पोलिसांनी आता दोन्ही मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच दोन्ही मोबाईल फोनचे आयएमईआय नंबर देखील चेकिंगला लावले जातील. जेणेकरून त्यांचे अचूक स्थान शोधता येईल आणि ते लवकरात लवकर सापडतील.