मोदी सरकारमधील मंत्री कौशल किशोर यांच्या पुतण्याने केली आत्महत्या, घरातच घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:06 PM2022-11-23T12:06:14+5:302022-11-23T12:06:49+5:30
Uttar Pradesh: केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मतदारसंघातील भाजपा खासदार कौशल किशोर यांचे पुतणे नंदकिशोर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मतदारसंघातील भाजपा खासदार कौशल किशोर यांचे पुतणे नंदकिशोर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नंदकिशोर यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आत्महत्येमागच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.
यापूर्वी कौशल किशोर यांची सून अंकिता यांनी मार्च २०२१ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अंकिता यांनी घराबाहेर जाऊन हाताची नस कापून घेतली होती. तिने तपूर्वी व्हिडीओ जारी करून पतील सांगितले होत की, मी कुणासोबतही भांडू शकत नाही. कारण तुमचे वडील खासदार आणि आई आमदार आहे. माझं कुणीही ऐकणार नाही. मी आतापर्यंत कुणालाही तुम्हाला हात लावू दिला नाही. मग मी तुम्हाला कसं मारू शकते? तरी तुम्ही किती खोटं बोलता. तु्म्ही आणि तुमच्या घरच्यांनी माझं जगणं कठीण केलं आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री कौशल किशोर हल्लीच श्रद्धा वालकर प्रकरणात केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप ही चुकीची असल्याचे सांगत मुलींनाच सल्ला देऊन टाकला होता. ते म्हणाले होते की, ही बाब चुकीची आहे. कुणीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाता कामा नये. ज्या तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, त्यांनी कोर्टातून पेपर बनवून घेतला पाहिजे. जर कुठल्याही तरुणासोबत राहायचे असेल तर लग्न करून राहिलं पाहिजे.