गॅस सिलिंडरचा नवा दर १०५३ रुपये; एका वर्षात किती दरवाढ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:09 AM2022-07-07T09:09:03+5:302022-07-07T09:09:29+5:30
१९ मे - रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ३.५० रुपये वाढ केली होती
नवी दिल्ली : घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी १,०५३ रुपये मोजावे लागतील. आधी ही किंमत १,००३ रुपये होती. विशेष म्हणजे मागील ४८ दिवसांतील ही दुसरी दरवाढ ठरली आहे. या दरवाढीने अगोदरच महागाईने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे.
एका वर्षात किती दरवाढ?
१ जुलै २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची दिल्लीतील किंमत ८३४.५० रुपये होती. ती आता १,०५३ रुपये झाली आहे. म्हणजेच मागील १ वर्षात गॅसच्या दरात २१८.५० रुपयांची वाढ झाली आहे. यावर मिळणारी सबसिडीही संपविण्यात आली आहे.
१९ मे - रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ३.५० रुपये वाढ केली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.