ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी साेमवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:59 AM2022-05-27T07:59:56+5:302022-05-27T08:00:20+5:30
मुस्लीम पक्षकारांचा युक्तिवाद अपूर्ण
वाराणसी : ज्ञानवापी-शृंगार गाैरी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे पुढील सुनावणी ३० तारेखेला ठेवण्यात आली आहे. तर, ज्ञानवापी परिसरातील सर्वेक्षणाचा अहवाल हिंदू पक्षकारांना छायाचित्रे आणि व्हिडिओसह शुक्रवारी देण्यात येणार आहेत.
हा खटला सुनावणीयाेग्य नसल्याचा दावा करताना अंजुमन इंतजामिया समितीने जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्यापुढे सुमारे दाेन तास युक्तिवाद करण्यात आला. ज्ञानवापी परिसरात शिवलिंग असल्याच्या केवळ चर्चा आहेत. ते अजून सिद्ध झालेले नाही. १९९१च्या कायद्यानुसार हे प्रकरण सुनावणीयाेग्य नसल्याचा दावा मुस्लीम पक्षकारांनी केला. तसेच मशिदीवर दावा करण्याचा अधिकार हिंदू पक्षकारांना नसल्याचाही युक्तिवाद त्यांनी केला. तर हिंदू पक्षकरांच्या वकिलांनी शिवलिंगाची ताेडफाेड झाल्याचा दावा करताना सांगितले, की आम्ही आमचे आक्षेप न्यायालयात दाखल केले आहेत. त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आम्ही बाेलू. (वृत्तसंस्था)